ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे शार्प शूटर भाजपाचे उमेदवार _ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
ड्रग प्रकरणातील आरोपी तुळजापूरच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार _ धीरज पाटील यांचा आरो

0
0
1
8
1
2
भारतीय जनता पार्टीने लोकांची केली फसवणूक, वर्षाला 2 कोटी रोजगार मिळाले का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
तुळजापूर दिनांक 30 डॉ सतीश महामुनी
तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक आणि तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसांना उमेदवारी दिली त्यामुळे महायुती व भाजप गुन्हेगारांना राजकारणामध्ये प्रतिष्ठा देणारा पक्ष आहे या पक्षाला मतदारांनी मतदान करू नये असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील जाहीर सभेत केले.
पुण्यामध्ये गुंडगिरी करणारा गजा मारणे प्रसिद्ध गुंड असून त्याचा सहकारी शार्प शूटर असणारा उमेदवार भारतीय जनता पार्टीने तुळजापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरवला आहे हे योग्य आहे का हे तुम्हाला पटते का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित ग्रामस्थांना विचारला तेव्हा लोकांनी सपकाळ यांना प्रतिसाद दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये लोकांना फसवे स्वप्न दाखवले दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते आज बारा वर्षानंतर 24 कोटी तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित होते हे रोजगार मिळाले का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुळजापूर तालुक्यातील काडगाव येथे निवडणूक प्रचार सभेमध्ये विचारला.
धाराशिव जिल्हा परिषद आणि तुळजापूर पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुकाध्यक्ष रामचंद्र आलूरे, काँग्रेसचे गटनेते अमोल कुतवळ, प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, शिवसेना नेते सुनील जाधव, उमेदवार सुनील रोकडे, रूपाली डोंगरे, सोनाली डोंगरे सुरेश कोकरे, गोविंद डोंगरे, धुळाप्पा रक्षे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आदानी आणि अडाणी यांच्यावर टीका केली. वंदे मातरम आणि भारत माता की जय हे नारे काँग्रेसचेच आहेत असे सांगून भावनेचे राजकारण करून लोकांना फसवले जात आहे. खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या जात आहेत. या प्रकारापासून आपण सर्वांनी सतर्क रहावे आणि सर्वांना सामावून घेणारे काँग्रेसचे धोरण स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक आमदाराचे नाव न घेता या भागातील रस्ते पाहता सत्ताधारी आमदार आहे याचे आश्चर्य वाटते आहे असे सांगून लोकांच्या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक होत नाही, येथील शेतकरी कायम अडचणीत राहिलेला आहे आज कांदा मोठ्या प्रमाणावर पिकून त्याला भाव नसल्यामुळे शेतकरी तोट्यात आहे तरीही सरकार मात्र विकासाच्या गप्पा मारते आहे त्यामुळे या सरकारला दूर करण्याची ही निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
प्रारंभी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी बोलताना घराणेशाही करणारे तुळजापूरचे आमदार आणि त्यांच्या ड्रग व शार्प शूटर सारख्या कार्यकर्ते आणि उमेदवारावर कडाडून टीका केली. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे लोक आहेत या लोकांना आत्ताच या निवडणुकीतून दूर ठेवा असे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेनेचे नेते धुळाप्पा रक्षे, दादा काडगावकर यांनी भाषण केली. सभेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी इतर पक्षातून कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या सर्वांचा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते प्रवेश दिला गेला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
0
1
8
1
2


