ई-पेपर
नळदुर्ग येथे हुतात्मा दिन साजरा
मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे योगदान मोठे

0
0
2
6
6
1
नळदुर्ग येथे हुतात्मा दिन साजरा
तुळजापूर दि 18 प्रतिनिधी
महाराष्ट्रातील निजामकालीन मुक्तिसंग्रामातील धाडसी स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा बाबुराव बोरगांवकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या पुतळ्याला बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर आणि सौ. रोहिणीताई बोरगांवकर, संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे योगदान फार मोठे आहे. नळदुर्गचे दोन सुपुत्र हुतात्मा बाबुराव बोरगांवकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांनी निजामाने पोसलेल्या रजाकारांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात हौतात्म्य पत्कारले, तेंव्हापासुन या दोन हुतात्म्यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष बसवराज धरणे, अप्पू स्वामी, समाजसेविका सुभत्राताई मुळे, नगरसेविका शुभांगीताई सुरवसे, नगरसेवक गायकवाड, कल्पनाताई गायकवाड, दयानंद स्वामी, सुभाष कोरे, दत्तू कोरे, प्राचार्य डॉ सुभाष राठोड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय चे उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जीवन विकास संस्थेच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
0
0
2
6
6
1



