ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
अजित पवार जाणे महाराष्ट्राच्या प्रचंड नुकसानीचे, उत्तम प्रशासक गमावला _ मधुकरराव चव्हाण गहिवरले, डोळ्यात अश्रू व मन सुन्न
राजकारणातील कोहिनूर हिरा लुप्त पावला

0
0
1
8
1
2
तुळजापूर दिनांक २९ डॉक्टर सतीश महामुनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत ही कल्पना सहन होत आहे. अनेक वर्षापासून ते माझ्यासोबत राहिलेले असल्यामुळे राजकारण आणि मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम केल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर काही वेळ मन सुन झाला आहे. प्रचंड मोठा अंधार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाल्याची भावना आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे माजी परिवार मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यां साठी अत्यंत महत्त्वाचे होते सर्व दूर संपर्क आणि राजकीय ठाम भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आपण राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यासोबत काम करताना अत्यंत जवळून अनुभवले आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा जबाबदार पदावर काम करत असताना महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या अनुषंगाने घेण्यात येणारे महत्त्वाचे निर्णय अजित पवार यांच्या निर्णय घेतल्यानंतरच पार पडतात. राज्याची तिजोरी आणि विकास प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन अजितदादा नेहमी निर्णय घेतात. मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाला त्यांनी कोणताही निधी कमी पडू दिला नाही. 2003 स*** संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाडा कृष्णा सिंचन योजना सुमारे 3000 कोटी रुपये देऊन मंजूर झाली आणि त्याच्यावर विलासराव देशमुख आणि अजितदादा पवार यांचीच स्वाक्षरी झाली त्यामुळे आपल्याला कृष्णा खोऱ्यातील 21 टीएमसी पाणी मिळत आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीच्या निमित्ताने अजित दादांनी दाखवलेले धाडस देखील धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी अजितदादा आणि राज्य शासनाने केलेले काम कधीही विसरता येणार नाही.
महाराष्ट्र राज्य शिखर बँक यावर आपण दोन वेळा चेअरमन म्हणून काम केले या काळात अजित दादा स्वतः संचालक होते आणि त्यांच्या मुळे शिखर बँकेच्या कारभारामध्ये कोणतीही अडचण वाटली नाही अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत करण्याची ठाम भूमिका अजितदादा घेत असत आणि सहकार ग्रामीण भागाच वरदान असल्यामुळे अनेक प्रकल्पांना मदत करण्याचा योग अजितदादांच्या सहकार्यामुळे मला मिळाला. अनेक आठवणी आज मनामध्ये आलेले आहेत मन अत्यंत चिन्ह आणि डोळ्यासमोर अंधार उभा राहिला आहे. महाराष्ट्राचे उमेद नेतृत्व ज्यांना आणखी बरच काही करण्याची उमेद होती आणि करण्याची क्षमता देखील होती, अशा नेत्याला काळाने अशा पद्धतीने घेऊन गेल्यामुळे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत मधुकरराव चव्हाण यांचे पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, काँग्रेसचे नेते तानाजी जाधव, स्वीय सहाय्यक बबन जाधव हे उपस्थित होते. ( पत्रकार डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर )
0
0
1
8
1
2


