ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर तालुक्यावर आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांचे वर्चस्व सिद्ध
समाजवादी पार्टीच्या वतीने देवानंद रोचकरी यांची मुलगी जिल्हा परिषदेसाठी आणि मुलगा पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत.

0
0
2
6
6
1
तालुक्यावर आमदार राणा जगजितसह पाटील यांचे वर्चस्व कायम
तुळजापूर दिनांक ९ प्रतिनिधी
ळजापूर तालुक्यावर आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले. जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टी ५, शिंदे शिवसेना १, काँग्रेस १, शिवसेना ठाकरे १, समाजवादी पक्ष १ अशी स्थिती आहे. पंचायत समिती सठी भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.
जिल्हा परिषद मधील विजेते आणि पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे काक्रंबा विजयी दयानंद शिंदे भाजपा ६३७५, पराभूत एडवोकेट रामचंद्र ढवळे ३६९१, नंदगाव विजयी सिद्धेश्वर कोरे भाजपा ७४४६, पराभूत सूर्यकांत अरबळे ठाकरे शिवसेना ५४१८, अनदूर विजयी डॉक्टर जितेंद्र कानडे ठाकरे शिवसेना ६६८०, पराभूत दीपक आलूरे भाजपा ६३६८, काठी विजयी आशा काळे भाजप ८७६६, पराभूत अर्चना काळे ठाकरे शिवसेना ६२६०, काडगाव विजयी निवृत्ती माळी भाजपा ६६५६, पराभूत सुनील रोकडे काँग्रेस ५९६०, सिंदफळ विजयी शितल भाले भाजप ६३०८, पराभूत विश्रांती शितोळे काँग्रेस ५८९०, शहापूर विजयी सुनील बनसोडे भाजपा ६२५८, पराभूत कचरु सकट ठाकरे शिवसेना ५६८२ , मंगरूळ विजयी सीमा माडजे समाजवादी पक्ष ६४५२, पराभूत महानंदा डोंगरे भाजपा ४७९०, रूपाली डोंगरे काँग्रेस २१९३, जळकोट विजयी प्रतीक्षा सुरवसे काँग्रेस ७३१५, पराभूत ज्योती चव्हाण भाजप ६२९० याप्रमाणे निकाल घोषित करण्यात आला.
पंचायत समितीचे सभापती असलेले प्रकाश चव्हाण यांनी अचानक निवडणुकीपूर्वी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारांनी त्यांना दारून पराभूत केले. बहुचर्चित अनदुर येथे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा लक्षवेधी विजय संपादन केला. समाजवादी पार्टीच्या वतीने देवानंद रोचकरी यांची मुलगी जिल्हा परिषदेसाठी आणि मुलगा पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत.
0
0
2
6
6
1



