आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
तुळजापूरचा विकास नक्की होणारच _ नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची ग्वाही
" तुळजापूर शहर स्वच्छ व सुंदर करणार "

0
0
1
8
1
2
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या तुळजापूरकरांना शुभेच्छा
तुळजापूर दिनांक २५, डॉ सतीश महामुनी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुळजापूर शहरवासीय आणि तालुक्यातील जनतेला नगरपरिषदेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर शहराचा आगामी काळात निश्चितपणे कायापालट होईल, राणा दादा यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जो तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केलेला आहे त्याला मूर्त स्वरूप देऊन तुळजापूर शहरवासी चांगले रस्ते, चांगल्या मूलभूत सुविधा, चांगले पाणी, शहराचे स्वच्छता व सुशोभीकरण याशिवाय अतिक्रमण मुक्त रस्ते देण्यासाठी आपण जाणीवपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. या कामासाठी शहरवासी यांचे व्यापारी आणि नागरिकांचे सहकार्य मिळावे ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. माझे सहकारी उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी इतर सर्व आमची टीम सर्व नगरसेवक यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
राज्य शासनाच्या वतीने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविला जात आहे. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील नागरिक आणि व्यापारी बांधव पुजारी बांधव या सर्वांना विश्वासात घेऊन आमदार राणा जगजीत सिंह पाटील हा विकासा आराखडा राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना आपण सगळेच मिळून सहकार्य केले पाहिजे विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणत्याही विकास काम पूर्ण होऊ शकत नाही. लवकरच पावणारा गणपती ते अग्रवाल भवन हा भवानी रोड समांतर रस्ता करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर निर्णय होईल त्यानंतर या मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना चांगला रस्ता मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातील लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांनी आपणास त्यांच्या प्रभागातील समस्या सांगितलेल्या आहेत त्या योग्य वेळी आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद वचनबद्ध आहे. विकास कामांमध्ये राजकारण न करता लोकांची सेवा झाली पाहिजे आणि त्यांना सुविधा मिळाली पाहिजे हा माझा पहिला प्रयत्न राहील असेही प्रजासत्ताक दिनाच्या या मुलाखतीमध्ये नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सांगितले.
0
0
1
8
1
2


