ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र
अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान _ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले
पाडोळी जिल्हा परिषद मतदार संघात अजित दादांना श्रद्धांजली

0
0
1
8
1
4
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच पाडोळी परिसरावर शोक काळा पसरली. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रचार शुभारंभाचा समारंभ या निमित्ताने रद्द करण्यात आला.
पाडोळी गटात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवार दयानंद शिंदे, व पंचायत समिती उमेदवार सुरज इंगळे, रेखा कावळे यांच्या प्रचाराला शुभारंभ करून नारळ फोडायला जमलेला समुदाय अचानक एक अत्यन्त दुर्दैवी घटना म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळले
म्हणून प्रचाराचा नारळ न फोडता अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या गटाचे निरीक्षक व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांनी अजितदादा यांना मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व पक्षाचे निवडणूक निरीक्षक शिवाजी बोधले यांनी अजित दादांचे निधन होणे केवळ बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पोरके करणारे निधन आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये त्यांच्याकडून जनतेला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्यावर नियतीने जो घाला घातला आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्राची नुकसान झाले आहे.
राजकारणा च्या पलीकडे शाळा, रस्ते, दवाखाने, स्त्री शक्ती, शेतकरी ज्यांच्या आयुष्यात त्यांनी उजेड दिला
तो प्रकाश आज शांत झाला नेते जातात.
पण काही व्यक्तिमत्व काळ बनून जातात
असे उदगार काढले . याप्रसंगी पाडोळी येथील नेते अजितदादा पवार, तानाजी गायकवाड, ऍड बाळासाहेब एखंडे, नीलकंठ पाटील, नागनाथ आपा पवार, धनंजय पाटील, दयानंद शिंदे, सदाशिव गुंड, व अनेक जनता उपस्थित होते
0
0
1
8
1
4



