ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याला समाजसेवेची मोठी परंपरा _ राजेश पांडे यांची प्रतिपादन

नूतन नगरसेवकांचा सत्कार

0 0 1 8 1 4

महाराष्ट्र राज्याला समाजसेवेचे खूप मोठे योगदान मिळालेले आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा होत आली आहे. या परंपरेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे निष्क्रः समाजसेवा केली आहे अशा महनीय व्यक्तींचा आज सन्मान होतो आहे हा आनंदाचा क्षण आहे असे उद्गार या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे नेते राजेश पांडे यांनी काढले.

शहर सकल ब्राह्मण समाज यांच्यावतीने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित ब्राह्मण नगरसेवकांचा सत्कार सोहळा सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर भाजपाचे नेते माधव भंडारी, भाजपा नेते राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.

भारतीय जनता पार्टीने नेहमीच गुणवत्तेला आणि निष्ठेला न्याय देण्याचे काम केले आहे. पक्षाने समाजातील या सक्षम नेतृत्वाला जनसेवेची संधी दिली आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवून विजय संपादन केला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव होताना पाहून मनस्वी आनंद होत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती नगरसेवक: कुणाल टिळक, स्वरदा बापट, मंजुश्रीताई खर्डेकर, पुनीतजी जोशी, ज्योत्स्नाताई कुलकर्णी, निवेदिता एकबोटे, मितालीताई साळवेकर (सर्व पुणे मनपा) आणि मंदारजी देशपांडे (पिंपरी चिंचवड मनपा) यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे