क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

तुळजापूरची भाच्ची… कु. आर्या यादव हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कास्य पदक जिंकले

0 0 3 5 3 9

तुळजापूरची भाच्ची…

आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू आर्या यादव हिचा तुळजापुरात सत्कार

तुळजापूर दि २१ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या आर्या यादव या खेळाडूचा तुळजापुरात सत्कार करण्यात आला. वेताळनगर येथील संतोष अशोक कोकडे यांची भाच्ची आर्या यादव तिची भारतीय कराटे संघात निवड झाली आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या वतीने या आंतरराष्ट्रीय यश प्राप्त खेळाडूचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

१९ एप्रिल २०२६ रोजी मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आर्या यादव हिने कांस्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या या यशा नंतर तिची १४ ते १७ मे दरम्यान ती फिलिपिन्स येथील जागतिक स्पर्धेमध्ये आर्या यादव ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबद्दल नगरसेवक नरेश अमृतराव व भाजपाचे नेते राम चोपदार यांनी तिचा सत्कार केला आहे.वेताळनगर येथील संतोष अशोक कोकडे यांची भाच्ची आर्या यादव तिची भारतीय कराटे संघात निवड झाली आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे, उप नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी,  प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, संस्कार भारती देवगिरी प्रांत सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी, भाजपा नेते गुलचंद व्यवहारे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, आधी मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे