ब्रेकिंगमहाराष्ट्र

१३६ वर्ष पूर्ण केलेली जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूर , दुर्लक्षामुळे परिसराची दुर्दशा 

शाळेचे माजी विद्यार्थी अवस्था पाहून झाले संवेदनशील

0 0 1 8 1 2

निजाम राजवटीमध्ये चालवली गेलेली जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूर सुमारे 100 वर्ष दिमाखत चालली परंतु आज प्रशालीची अवस्था मरणयातना भोगत असल्यासारखी दिसून येत आहे. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवली तर ही प्राचीन प्रशाला पुन्हा एकदा दिमागदार होईल असा विश्वास माजी विद्यार्थ्यांना आहे.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी च्या निमित्ताने या प्रशालेमध्ये माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली असता प्रशालेच्या बाहेरच्या परिसरामध्ये झालेली दुर्गंधी आणि दुरावस्था दिसून आली. 1990 पर्यंत या ठिकाणी पहिली ते दहावी आणि अकरावी बारावीचे वर्ग देखील चालविले जात होते. अकरावी बारावीचे विज्ञान शाखा या ठिकाणी चालवली जात होती परंतु शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यानंतर खाजगी संस्था वाढल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा अडचणीत आल्या. आज या प्रशालेमध्ये केवळ शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या सेविका प्रवरा प्रकाश हंगरगेकर यांनी प्रशालेच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करताना डोळ्यांमधून पाणी काढले.
आपले पती केल्याचे दुःख मी सहन केले परंतु शाळेपासून दूर झाले. शाळेवर आलेल्या अनेक अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केला, शाळेची स्वच्छता आणि सुरक्षितता यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 26 वर्षाच्या सेवेमध्ये कधीही रजा न घेता शाळेपासून दूर झाले नाही. आजही वाटते की, प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमधून शाळा पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव प्राप्त करून चालू राहील, याच अपेक्षेने जगते आहे.

शाळेचे माजी विद्यार्थी बाळासाहेब शामराव व महेश कुलकर्णी यांनी या निमित्ताने माजी विद्यार्थी संमेलन या शाळेमध्ये आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमधून शाळा परिसराची स्वच्छता आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून विद्यार्थी वाढविणे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बोलून दाखवले.
136 वर्षे पूर्वीची म्हणजे 1889 साली ही शाळा सुरू झाली त्याला प्रशासकीय मान्यता 1946 साली मिळाली आहे या शाळेमध्ये नामवंत इतिहास अभ्यास क. भ. प्रयाग हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. व ग सूर्यवंशी, बिंदूमाधव जवळेकर,  शहाणे गुरुजी, खिचडे गुरुजी, पांढरे गुरुजी यांच्यासारखे विद्वान येथे शिक्षक म्हणून होते. अनेक नामवंत शास्त्रज्ञ, वकील, जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी,  तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंत्रालय सचिव, देशपातळीवर यशस्वी सेवा देत आहेत. “जेव्हा कुठेच शिक्षण उपलब्ध नव्हते तेव्हा या शाळेने विद्यार्थी घडवले.”मोठा इतिहास आणि प्राचीन वारसा लाभलेली ही शाळा जिल्हा परिषद धाराशिव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि तुळजापूर शहरातील लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्या उदासीनतेमुळे आज मरण यातना भोगत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे