ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली !

निर्णय क्षमता असणारा प्रबळ नेता हरवला, तुळजापूरचे नुकसान झाले

0 0 1 8 1 2

ll जागेवर निर्णय घेणारा धाडसी नेता अजितदादा यांचे निधन अविश्ववसनीय _नगराध्यक्ष विनोद गंगणे 

आम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली 19 नगरसेवक निवडून आलो आणि शंभर टक्के निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला होता तेव्हा अजित दादांनी आमचा जो सत्कार केला होता तो आयुष्यभर न विसरणारा आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने काम सुरू असताना उपमुख्यमंत्री अजितदादा जानी अत्यंत क्लेशदायक आणि दुःखाची घटना आहे अशी प्रतिक्रिया तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी मराठी समाचार ला दिली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड जनाधार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास असणारा नेता. महाराष्ट्राचे भविष्य म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहत होतो. अलीकडच्या काळात त्यांनी केलेले राजकारण आणि राजकारणामध्ये घेतलेले निर्णय अत्यंत चमत्कारिक आणि तेवढेच अजित दादा यांच्या स्वभावाला साजेसे असेच राहिले. अजित दादा रोखठोक आणि प्रसंगांवरून योग्य निर्णय घेणारा नेता म्हणून मी त्यांना जवळून अनुभवले आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या चार-पाच विषयाच्या अनुषंगाने जेव्हा मी अजित दादाकडे गेलो तेव्हा 100% काम करूनच आलो आहे असे देखील या निमित्ताने नगराध्यक्ष विनोद गंगणे म्हणाले. तुळजाभवानी देवी वर त्यांची श्रद्धा आहे तसेच तेर धाराशिवचे ते जावई आहेत. खऱ्या अर्थाने धाराशिव जिल्ह्याचा खूप मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक पक्षामध्ये अजितदादा पवार यांच्यासारखा नेता असलाच पाहिजे त्याच्याशिवाय त्या पक्षाची घडी आणि निर्णयाची गती वाढणार नाही यावर माझा विश्वास आहे परंतु नियतीने अजित दादांना एवढ्या लवकर घेऊन जावे हे मनाला न पटणारे आहे. अजित दादा म्हणजे अजितदादा होते. मी होते देखील म्हणणार नाही कारण आजही अजित दादा आहेतच, राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्वांनीच अजितदादा यांची आदर्श आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती स्वीकारावी आणि लोकांचे वेळेमध्ये काम करावे म्हणजे तीच खरी अजित दादांना श्रद्धांजली ठरेल असे देखील अत्यंत संवेदनशील मनाने नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे