ब्रेकिंग

भ्रातृमंडळ, पुणेचा स्नेहमेळावा उत्साहात : ‘वर्षारंभ’ अंकाचे प्रकाशन

ऐक्य, शिक्षण, परिश्रम या त्रिसूत्रीचा लेवा पाटीदार समाजाने अवलंब करावा : साधना फिरके

0 0 1 8 1 2

पुणे : लेवा पाटीदार कष्टकरी, प्रामाणिक आणि शेतीविषयक कार्य करणारा प्रगतीशील समाज समजला जातो. ऐक्य, शिक्षण व परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लेवा पाटीदार समाजाने प्रगती साधत समाजबांधवांनाही मागदर्शन करावे आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या बांधिलकीतून देशाचाही विकास साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातील निवृत्त अतिरिक्त आयुक्त साधना फिरके यांनी केले.

भ्रातृमंडळ, पुणेचा स्नेहमेळावा वारजे येथील मुलांच्या वसतीगृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी साधना फिरके यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. भ्रातृमंडळ, पुणेचे माजी अध्यक्ष डॉ. राम खर्चे, अध्यक्ष अनिल बोंडे, उपाध्यक्ष डॉ. संजय झोपे, सचिव नरेंद्र महाजन मंचावर होते. या वेळी लेवा जीवन शैलीची सांस्कृतिक अभिव्यक्ती दर्शविणाऱ्या ‘वर्षारंभ’ अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘वर्षारंभ’चे संपादन दत्ता पाटील यांनी केले आहे.साधना फिरके पुढे म्हणाल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत सामाजिक क्षेत्रात लेवा पाटीदार समाजाने उत्तम कार्य करावे. उच्च शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणातून समाजाची प्रतिष्ठा उंचवावी.डॉ. राम खर्चे म्हणाले, आयुष्यात प्रगती साधत असताना अध्यात्माची कास धरल्यास मनशांती लाभेल. आपला विकास साधताना समाजबांधवांना बरोबर घेऊन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.

आयुष्य अनुभवसंपन्न व सुखीसमानाधी कसे होईल, या विषयी मार्गदर्शन करताना डॉ. सुहास महाजन म्हणाले, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन योग्य व सकारात्मक असल्यास आनंद व समाधान लाभते. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या डॉ. निलिमा वारके, आरती बोरोले, भूपाली राणे, निलिमा काळे, सरला भिरूड, ऋतुजा दराडे, सलिल पाटील, सचिन नेमाडे, सोहम महाजन, विनोद भोळे यांच्यासह साधना फिरके, सुनिल राणे, दत्तात्रय टेकाडे या सेवानिवृत्तांचा तसेच डॉ. सुहास महाजन, रवींद्र भोळे, प्रल्हाद भंगाळे, राजाबाई तळेले या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

समाजशास्त्राचे अभ्यासक सतीश फिरके यांनी करिअर व रोजगाराविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटची निर्मिती केली असून त्याचे उद्‌घाटन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.लेवा सखी मंचची माहिती स्नेहल महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन दिपाली खडके यांनी केले तर मान्यवरांचा परिचय आरती टोके यांनी करून दिला. आभार अनिल बोंडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे