गुन्हेगारी
तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूरच्या पोलिसांच्या विरोधात महत्त्वाची भूमिका, गुन्हेगारी वाढल्यामुळे तुळजापूरकर त्रस्त पोलीस मात्र मस्त
राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच घेतली पोलीस विरोधात भूमिका, पोलीस खात्यात खळबळ

0
0
3
5
3
9
तुळजापूर पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची महाविकास आघाडीचे मागणी
तुळजापूर दिनांक 8 प्रतिनिधी
तुळजापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्यामुळे दिवसाढवळ्या कोणाच्या घटना तसेच भाविकांना लुटण्याच्या घटना सातत्याने होत असताना पोलीस मात्र या गुन्हेगारीच्या कामकाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ मशीन हातामध्ये घेऊन दंड वसूल करण्याचा पवित्रा घेऊन वावरत असल्यामुळे तुळजापुरातील जनता पोलिसाच्या कारभाराला कंटाळली आहे, तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून काम करणाऱ्या विरोधी पक्षाने दंड थोपटले असून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. 
-
सामान्य माणसाने पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगाराच्या दवाखाली राहून किती अन्याय सहन करायचा याला आता परिसीमा गाठली म्हणता येते कारण गुन्हेगारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत शहराची शांतता आणि सुव्यवस्था अत्यंत धोक्याच्या स्थितीत आहे कधीही कोठेही गैरप्रकार गैरव्यवहार आणि खून मारामाऱ्या रक्तबंबाळ चाकू हल्ले असे प्रकार सुरू आहेत या प्रकारामुळे शहरातील सुज्ञ नागरी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकापासून भीतीच्या सावता वाहतो आहे. तुळजापुरातील मकावती गल्ली परिसरातील महिला भगिनींनी मोर्चा काढून पोलीस स्टेशनमध्ये याविषयी आपली व्यथा मांडली. त्या अगोदर तुळजापूरच्या नगरसेविका सुपया विजय गंगणे यांनी बस स्थानक परिसरात महिलांना होणारा त्रास प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखत घेऊन पोलिसांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन आवाज उठवला. त्यापाठोपाठ महा विकास आघाडीने तुळजापूर शहरात वाढलेली गुन्हेगारी गुंडगिरी भाविकांना लुटण्याचे प्रकार महिलांना त्रास होण्याचे प्रकार आणि दिवसाढवळ्या मारहाण चाकू हल्ले आणि खून देखील झाल्यामुळे सर्व शहर सुन्न झाले आहे. पोलीस मात्र या विरोधात कोणतीही भूमिका घेत नाहीत त्यांचे फक्त मशीन दाबून हप्ते वसूल करण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यांनी आपल्या निवेदनाद्वारे या सर्व प्रकाराला वाचा फोडली आहे या निवेदनामध्ये त्यांनी येथील कार्यरत असणारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे गुन्हेगाराबरोबरचे पोलिसांची संबंध प्रशासना समोर शासनासोर आणि जनतेसमोर येतील अशी अपेक्षा आपल्या निवेदनामधून मांडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, नगरसेवक आनंद जगताप, सुदर्शन वाघमारे, अक्षय कदम, सौ प्रगती लोंढे, माजी तालुकाध्यक्ष अमर मगर ,शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर उपजिल्हाप्रमुख शिवसेना शाम पवार, उत्तम अमृतराव, राहुल खपले, यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी यांनी आपले स्वाक्षरीचे निवेदन देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या या कामचुकारपणा आणि दुर्लक्षपणा यावर बोट ठेवले आहे त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यामुळे पोलीस खात्यामधील चाललेला मनमानी कारभार समोर आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या निवेदनानंतर पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली असून अंतर्गत असणाऱ्या गैरव्यवहार आणि मनमानी कारभाराच्या चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने सर्वत्र शांतता पसरली आहे.
0
0
3
5
3
9