ई-पेपरमहाराष्ट्र
लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण

0
0
3
5
4
0
लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
तुळजापूर दि 1 डॉ सतीश महामुनी
१ मे २०२६ महाराष्ट्र दिन – कामगार दिन लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ . एन आर मलबा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव कुतवळ शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार व अविनाश गव्हाणे तसेच पालक व विद्यार्थी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले . यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक परीक्षेतील यशाचा आलेख म्हणजेच निकाल वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी कारंडे व सुनिता शिंदे यांनी परिश्रम घेतले. 
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि शहरवासीयांना आम्ही शुभेच्छा देत आहोत असे या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नरसिंग मलबा यांनी सांगितले.
0
0
3
5
4
0



