ई-पेपरसंपादकीय

भारताच्या जनगणनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे आवाहन

महाराष्ट्र दिनापासून जनगणनेला तुळजापुरात सुरुवात

0 0 3 5 3 9

भारताचे जनगणनेमध्ये तुळजापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे –  नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे आवाहन 

तुळजापूर दि १  डॉक्टर सतीश महामुनी 

भारताच्या आजपासून सुरू झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या जनगणनेच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन आपली माहिती निवडणूक आयोगाच्या आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्याला द्यावी असे आवाहन तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी केले आहे.

देशपातळीवर सुरू झालेल्या जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तुळजापूर शहर आणि तालुक्यातील सर्व कुटुंबांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. आपल्या कुटुंबातील किती लोकांची नावे निवडणूक आयोगाच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट आहेत याशिवाय किती लोकांची नवीन नावे या मतदार यादी मध्ये समाविष्ट करावयाची आहेत याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाचे कामकाज करणाऱ्या आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्याला आपण द्यावी. हे राष्ट्रीय कार्य आहे यामध्ये सहभागी होणे अत्यंत गरजेचे आणि देशाच्या जडणघडणीसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे आपण आपल्या कुटुंबाच्या महत्त्वाच्या कामाला जसा वेळ देतो त्याचप्रमाणे मौल्यवान काम समजून या निवडणूक आयोगाच्या कामाला सर्वांनी सहकार्य करावे मी स्वतः सहभागी झालो आहे आपण ही सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, गटनेते औदुंबर कदम यांची उपस्थिती होती. 

याशिवाय नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सोशल मीडियावर आपला स्वतःचा व्हिडिओ करून देखील लोकांना या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमने या कामाला गती देण्याच्या उद्देशाने आपली पूर्वतयारी केली आहे सर्व शहर व प्रभागातील नागरिक व कुटुंबांनी निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे देखील आवाहन या निमित्ताने केले आहे. डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे