आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

सत्तेचा उपयोग सत्ताधारी आणि विरोधी असा न करता एकसमान धोरणाने निर्णय घ्यावेत _ पत्रकार परिषदेमध्ये गटनेते अमोल कुतवळ मागणी  

मुख्याधिकारी यांनी विशेष टिपणी न दिल्याने महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची नाराजी

0 0 1 8 1 2

नगरसेवक संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करीत आहेत याचा विसर सभागृह आणि प्रशासनाने पडू देऊ नये_  नगरसेवक रणजीत इंगळे

 

तुळजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी जे विषय प्रस्तावित केलेले आहेत या विषयाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांची विशेष टिपणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना देण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने गटनेते अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी वेळोवेळी विशेष टिपणी ची मागणी करून देखील दुर्लक्ष केले आहे. शुभेच्छा दिवशी सकाळी देखील एक तास आम्ही मुख्याधिकारी कक्षामध्ये बसून या टिपणीची मागणी केली होती परंतु सभा सुरू असताना दिली जाईल अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली प्रत्यक्षात सभेमध्ये ही टिपणी दिली नाही यावरून मुख्याधिकारी यांचा पक्षपाती समोर आला आहे. आम्ही नगरसेवक संपूर्ण शहराचे असून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना ही मिळत असलेली सभागृहातील वागणूक लोकशाही आणि नगरपरिषद प्रशासनाच्या धोरणाविरुद्ध आहे तातडीने ही विशेष टिपणी आम्हाला मिळावी अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल रणजीत इंगळे आनंद जगताप अक्षय कदम  सौ. कदम चिवचिवे यांनी केली आहे.

नमुना अ मध्ये नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी 80 विषय प्रस्थापित केलेले आहेत. या सर्व विषयाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना विश्वासात घेणे दखील गरजेचे आहे, विरोधी पक्षाच्या प्रभागामध्ये स्वच्छता आणि रस्ते व नाली बांधणी, त्याचबरोबर इतर सुविधा देण्यासाठी  मनमानी कारभार होताना दिसत आहे ही बाब चुकीची आहे याविषयी आम्ही जनतेच्या दरबारात आवाज उठवू आणि मुख्याधिकारी व सत्ताधारी मंडळींना समान धोरणाने विकास करण्याच्या अनुषंगाने दबाव वाढवून असेही यावेळी नगरसेवक आनंद जगताप यांनी सांगितले.

निवडणुका संपल्यानंतर सर्व नगरसेवक संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करीत आहेत याचा विसर सभागृह आणि प्रशासनाने पडू देऊ नये, शासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी संपूर्ण शहरासाठी निधी देत असते त्याचा उपयोग नगरपालिकेच्या सत्ताधारी मंडळींनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या प्रभागासाठी करू नये,  सत्तेचा उपयोग सत्ताधारी आणि विरोधी असा न करता एकसमान धोरणाने निर्णय घ्यावेत अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक रणजीत इंगळे यांनी मांडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे