ब्रह्मदेवाच्या मूर्ती प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे हिंदू राष्ट्र सेनेचे मंदिर संस्थान अध्यक्षांना निवेदन, कोणती कारवाई होणार याकडे तुळजापूरकरांचे लक्ष.
इतर वेळी मंदिर संस्थान कारवाई करण्याचे धोरण तात्काळ राबवते याप्रकरणी काय होणार ?
श्रीब्रम्हदेव मूर्ती भंग प्रकरणी दोषींवर कारवाई झाल्याशिवाय नवीन निर्णय घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी डॉ सतीश महामुनी
तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन ब्रम्हदेव मूर्ती भंग प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई झाल्याशिवाय या विषयात नवीन निर्णय घेऊ नये, मंदिर प्रशासन चुका करणाऱ्या वर कधी शासन करणार आहे या मागणीची निवेदन हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने मंदिर संस्थांच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती कुमार पुजार यांना दिले आहे. या प्रकरणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरकोळ चुका केल्यानंतर मंदिर बंदीची कारवाई करणारे संस्थान ब्रह्मदेवाच्या मूर्ती प्रकरणी मात्र अद्याप कारवाई करत नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
मागील वर्षी श्री तुळजाभवानी मंदिर प्राधिकरण दरम्यान श्री ब्रम्हदेवतांची मूर्ती मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे भंग पावली होती. या संदर्भात पुजारी मंडळ, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह , विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवून दोषींवर कठोर कारवाई ची मागणी केली होती. तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने या प्रकरणी तुळजापूर न्यायालयात या संबंधी तक्रार दाखल केली असून हा विषय न्यायप्रविष्ट आहे.
परंतु मूर्ती भंग प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी व हा विषय मोडित काढण्यासाठी घाईघाईने या संदर्भात मंदिर प्रशासन नवीन निर्णय घेत आहे ही मंदिर संस्थांची कृती अत्यंत चुकीचे आहे जोशीवर कारवाई केल्याशिवाय पुढील कोणतेही कार्यवाही करू नये असे या निवेदनात म्हटले आहे. मंदिर संस्थानाध्यक्षांना निवेदन देताना हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख परीक्षित साळुंके,ऍड.शुभम खोले व सहकारी उपस्थित होते.
तुळजाभवानी मंदिर मध्ये लहान मोठ्या चुका झाल्या तर तातडीने कारवाई केली जाते मंदिर बंदी देखील करण्यापर्यंत मजल मारली जाते परंतु ब्रह्मदेवाची मूर्ती भंग करून प्रशासनाने अद्याप कोणतीच कारवाई न केल्यामुळे याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या या निवेदनानंतर मंदिर संस्थानचे अध्यक्ष या पकरणी कोणती कारवाई करतात याकडे सर्व तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे
पालिकेची गटनेते अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सुचवलेल्या विकास कामाचे १५ दिवसात सुरू करण्याचे आव्हान
1 day ago
धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्या. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
3 days ago
पुणे संशोधन व नवसंकल्पनाची जननी – पानिपतकार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील
5 days ago
तुळजापूर तालुक्याने आदिशक्ती पुरस्कारामध्ये वाजविला डंका… जवळगा मेसाई पहिला तर वडाचा तांडा अभियानामध्ये तृतीय, तुळजापूर तालुक्यासाठी अभिमानास्पद कामगिरी
6 days ago
रस्ता आणि एसटी बसच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांची उपोषण
1 week ago
संगीत रंगभूमी नेपथ्य कलाकार संतोष गायकवाड आणि अष्टपैलू कलाकार सयाजी शेंडकर यांचा जयमाला शिलेदार गुणगौरव पुरस्काराने सन्मान
1 week ago
माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. वाचन-लेखनाचा वारसा आजोबांकडून मिळाला – दीप्ती चंद्रचूड
1 week ago
स्वरसुधा’तर्फे संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने सुप्रसिद्ध सतार व सूरबहारवादक पंडित संतोष बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘सूर संतोष संगीत सुधा’ या गायन-वादन मैफलीचे आयोजन
1 week ago
विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन, प्रसिद्ध नृत्यांगना मुक्ती श्री यांचा मोहक पदन्यास आणि अभिनवगंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर यांच्यासह शुभम व सुरंजन खंडाळकर यांचे सुश्राव्य गायन यातून ज्ञानदेव संगीत महोत्सवात रंगत
1 week ago
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘वेदकालीन स्त्री ते मॉडर्न गर्ल’ विषयावर व्याख्यान