ई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगसंपादकीय

मध्यरात्रीपर्यंत जिल्हा परिषदेचे कामकाज करणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

डॉक्टर पद्मसिंह पाटील ते सौ अर्चनाताई पाटील, जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असणारा परिवार

0 0 4 7 4 1

धाडसी आणि निर्धारपूर्वक प्रशासकीय कामकाज करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई पाटील

तुळजापूर दिनांक  १८ डॉक्टर सतीश महामुनी

धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांच्या बद्दलची त्यांच्या समर्थकांच एक पोस्ट फेसबुक वरती वाचली . ज्यामध्ये मध्यरात्री दोन वाजेपर्यंत अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून अर्चनाताई पाटील प्रशासकीय कामकाज करीत आहेत. हि बाब लक्षात आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे अर्जुनाताईचे कौतुक केले आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा जगजीत सिंह पाटील, सौ अर्चनाताई पाटील, आणि मल्हार पाटील यांच्याबाबत सकारात्मक आणि कार्यकर्त्यांना बळ देणारी लिखाण तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रोहित पाटील या कार्यकर्त्यांनी केली आहे.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगल्याला चांगलं म्हणायचं धाडस आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये राहिलेले नाही. सावरगाव येथील रोहित पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेले राजकारण लक्षात घेता केलेले हे विधान अत्यंत कौतुकास्पद आणि तेवढेच जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी मोलाचे महत्त्वाचे आणि प्रोत्साहन देणारे आहे. कार्यकर्ता कोण आहे याच्यापेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि आपल्या नेत्यांच्या कामकाजाबद्दल व्यक्त केलेल्या समाधान यामुळे अनेकांना धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद परिघामध्ये खूप चांगल्या गोष्टी होत आहेत याची जाणीव होऊ शकते. राजकारणामध्ये सर्वच जण शह काटशह आणि आरोप प्रत्यारोप करीत असतात, अनेक वेळेला समोरच्याचे कौतुक न करण्याचा स्वभाव राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. यावरून या सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या कामकाजाबद्दल आणि धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून मध्यरात्रीपर्यंत एका महिला अध्यक्षांनी काम करावे हे खरेच इतर सर्व कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. या पोस्टच्या निमित्ताने रोहित पाटील यांचे कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे त्यांनी एक चांगला पायंडा पाडण्याचा प्रयत्न राजकारणामध्ये केला आहे. गलिच्छ आणि नकोशा झालेल्या राजकारणामध्ये कधी कधी मनाला भावणारे आणि सकारात्मकता दाखवणारे प्रसंग दिसून येतात त्यामधील हा एक जुलै महिन्यातील सकारात्मक प्रसंग आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष होणार म्हणून मानले गेल्या होत्या. आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करतात त्यामुळे अर्चनाताई पाटील यांनी एखादी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांनी अध्यक्ष होणे हे प्रस्थापित राजकारणामध्ये वेगळे निश्चित नाही परंतु प्रचारामध्ये अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर विरोधकाकडून घराणेशाहीचा झालेला आरोप आणि आपल्या कामाच्या माध्यमातून अर्चनाताई पाटील यांनी दिलेले उत्तर या सर्वच बाबींचा विचार या एक दिवसांमध्ये केलेल्या पोस्ट मधून दिसून आलेला आहे. खऱ्या अर्थाने माजी मंत्री म्हणून काम केलेले आणि विद्यमान तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील अनेक पातळीवर काम करीत आहेत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे योजना शासन पातळीवर मंजूर करून त्याला कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अनेक अडचणी आज शासन दरबारी असतात अर्थ खात्याचे मंजुरी सगळ्यात किचकट विषय आहे परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेले प्रयत्न आणि आणलेल्या मंजुरी यामुळे जिल्ह्यामध्ये आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणावर विकासात्मक योजना कार्यान्वित होणार आहेत हे राहणार दादा यांच्या कामाचे यश आहे. या बरोबरीने अर्चनाताई पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा आपल्या कष्टाने व्यक्त करून मध्यरात्रीपर्यंत काम करण्याचा अध्यक्ष म्हणून केलेला प्रयत्न निश्चितच राणा दादा यांच्या प्रयत्नांना पाठबळ देणार आहे.

सोबत खाली दिलेली सावरगाव येथील रोहित पाटील यांची पोस्ट आहे सविस्तर वाचावी.

विरोधकांनी घराणेशाही म्हणून हिनवल पण जिल्हा परिषद मध्ये रात्री च्या २ वाजेपर्यंत थांबुन जि प च्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील त्यांना कामातुन देत आहेत चपराक*

*धाराशिव जिल्हयाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आमच्या माऊली* जिल्हा परिषद निवडणूक झाली , आणि निवडणूक झाल्यानंतर राणदादांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मध्ये भाजप आणि महायुती ला बहुमत मिळाले. यावेळी सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी अध्यक्ष पदासाठी सौ अर्चनाताई पाटील यांना मिळावी असा प्रयत्न झाला , तशी आम्ही सर्वांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली.

या बद्दल विरोधकांनी घरानेशाही म्हणून हिनवल पण आम्हाला आमच्या नेत्या आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्या वर विश्वास होता कि त्या या पदाला नक्कीच न्याय देणार आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी मेहनत घेणार, त्या विश्वासाला साथ देत आज आमच्या माऊली जिल्हा परिषद च्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील या संपूर्ण दिवस आणि रात्रीच्या २ वाजेपर्यंत थांबुन जिल्ह्यातील प्रश्न तळमळीने मार्गी लावण्यासाठी थांबत असतात. खरोखरच ताई आम्हाला अभिमान वाटतो कि तुम्ही आमच्या नेत्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही दाखवुन दिलत कि रात्री 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद फक्त धाराशिव ची जिल्हा परिषद चालु असते.

ताई मला नेहमी वाटतं कि पाटील परिवार ज्या पोटतिडकीने , तळमळीने आणि प्रामाणिकपणे जिल्ह्याची सेवा करत असता जिल्हा कधीही तुम्हाला विसरणार नाही. डॉ साहेबांच्या नंतर , राणा दादा, ताई तुम्ही आणि मल्हार दादा ज्या तळमळीने काम करतं आहे त्याला खरोखर सलाम.अभिमान वाटतोय कि मी पाटील परिवाराचा कार्यकर्ता आहे. रोहित पाटील सावरगाव ता तुळजापूर*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे